Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.69: [14-9-1764] Naro Krishna asks Ambadas Ballal to forestall the attempts of Lakshman Konher for the capture of the fort of Deher and to effect its capture on his behalf by whatever means possible.

Selections from the Peshwa Daftar 29.69

Language
Marathi

29.69

पौ छ १८ रावल सनवार

मुा तळेगांव

श्री.

राजश्रियाविराजित राजमान्य

राजश्री अंबादासपंत स्वामीचे शेवसी.

सेवक नारोकृष्ण सांा नमस्कार विनंती उपरी येथील कुशळ जाणोन स्वकीये लेखन करणे विशेष. तुम्हीं पाा ते पावले. किल्ले देहेरचे+ राजकारणाचा मजकूर लिा तो कळला. ऐसास किला हस्तगत युक्तीने आणि लौकर होत असिला तर राजकारण करून, यामुळे हजार दोन हजार पावेतो खर्चहि पडला तर लौकर स्थळ हस्तगत करणे. श्रीमंताची स्वारी जलदीने निघणार. राऊत हजूर बोलवावे लागतील यास्तव त्वरा करून कार्यभाग स्वाधीन करून घेणे. तुमचे पत्राचे सविस्तर उत्तर व जफ्तीच्या संदा मागाहून रवाना करूं. सूचनार्थ हे पत्र लिहून मुजरद पाा आहे. याउपर विलंभ न करणे. उत्तर सत्वर पाठवावे. राा छ १७ रावल सुा खमस सितैन मया व अलफ. दौलताबाजकडून लक्ष्मण कोन्हेरे याजकडील कांहीं लोक किल्याखालते आले होते तो अर्थ तुम्ही काहीच लिा नाहीं, आणि तुम्ही किल्यापासून दूर आहां ऐसी त्याजकडील कारकून बातमी दरबारी सांगत असतो. त्याजकडील लोकांनीं किला हस्तगत करावयाचे राजकारण केले होते ते बिघडलें. पुढेहि ते उद्योगात आहेतच असे बोलतात. यास्तव तुम्हास पत्र लिा असे तर कळेल तैसे कसब करून किल्याचे सूत्र करून हस्तगत होयसा असिला तर करणे. दुसरेयाकडील काम करतील तुम्ही पाहत राहाल यास्तव लिा असें. फार दिवस बसतां बननार नाहीं. मोर्चेहि समीप बसवितां मसलत पडते. मोगलाचे निसबतचा किला यास्तव ठीक पडणार नाहीं. गडबडीत झटपट काम जालियासच मात्र सोईस पडेल यास्तव काय मजकूर तो लिहून पाठवणे. देहर चाळीसगावचे अमलाचा बंदोबस्त कराल तर चिंता नाहीं. तूर्त फिसादच पडली आहे. महाल कांही राजश्री आबाचे सरंजामात नाहींत. मागाहून सविस्तर पत्रे पाठवितो. बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे हे विनंती.

[+ खान्देशांत.]

4186