Selections from the Peshwa Daftar 29.7: [29-6-1761] Chimanaji Ranganath writes to Mahipatrao that he has been detained in the camp of Ganesh Sambhaji owing to the unsafe condition of roads. He further adds that the news of the defeat of the Marathas at Panipat has encouraged the Bundela chiefs Hindupat and Khetsing to throw off Maratha allegiance.
Selections from the Peshwa Daftar 29.7
- Language
- Marathi
29.7
श्री
श्रीमंत राजश्री महिपतराव दादा गोसावी यांसी
स्नेहपूर्वक चिमणाजी रंगनाथ कृतानेक आसीर्वाद विनंती उपरी. येथील क्षेम ता॥ छ २९ जिल्काद मु॥ पाहाडी प्रांत झासी सुखरूप असो विशेष. तीनचार वेलां पत्रें पाठविली परंतु पत्राचें उतर येकहि न आलें. तेणेकरून चित सापेक्षित असे. तरी येसें न पाहिजे. सदैव पत्र पाठऊन तोषवीत जावे. राजे खेतसिंग याचा मजकूर तरी पूर्वी सरकारांत येकनिष्ठेता दाखविली. लढाईचा प्रकार झाल्यास पूर्वीच्या बुधीस ठिकाणा राहिला नाहीं. तैसमई राजे हिंदुषत जागानि काही देत होता परंतु ते समईं भेटला नाही. दिलीकडील प्रकार जाल्यास कितीका प्रकारचा ध्यानांत आंदेशा आणून उभयेता बंधु एकत्र जाले. राजानीं खर्चास कांहीं एक दिल्हे नाहीं. येथें लोकांचे कर्जदार जालो. देसी जावे तो मार्ग फुटत नाहीं. रो गणेश संभाजी यापासीं आहो. राजकी वर्तमान तर श्रीमंताच्या पत्रीं सविस्तर व राज्याकडील साद्यंत विस्तार लिहिला आहे. आपण आम्हास आश्रे आहेत दुसरा कोन्ही नाहींत. श्रीमंतास पत्र पाठविलें आहे ते आक्षरशा वाचून दाखवावे आणि जाब सत्वर लेहून पाठवावे. पुढे जैसी आज्ञा येथें राहावें कीं देसी श्रीमंतापासीं यावें. ज्याप्रमाणें आपण लेहून पाठवितील त्याप्रा वर्तणूक करीन. कासिदास मार्गाकरितां खर्चास त्यानीं थोडी घेऊन गेले. त्यास सरकारातून खर्चास देवावे म्हणजे मार्गाची त्याची बेगमी होईल. बहुत काय लिहिणे हा आसीर्वाद.