Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.8: [June 1761 ?] Letter from Gopalrao Ganesh to Chintopant describing how earnestly he was trying to re-establish Maratha influence at Delhi after the disaster of Panipat.

Selections from the Peshwa Daftar 29.8

Language
Marathi

29.8

श्री

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री चिंतोपंत दाजी

स्वामीचे सेवेसी

पो गोपाळराव गणेश सां नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहीत असिले पाहिजे विशेष. आपण पत्र पाठविले ते प्रा जाहाले. लिहिले वर्तमान सविस्तर कलो आले. त्यास पत्रे आज आम्हास व राजश्री गणेशपंत आणास आली. तेथे लिहिले आहे जे अबदाली आपल्या देशास गेला. सुज्यातदौला लखनूस पलोन गेला. नजीबखान व गाजदीखान दिलींत आहे. त्याजकडून वकील सलूखास आले आहेत. त्यास दिलीकडील बंदोबस्तास राजश्री गंगाधरपंत तात्यास पाठविले आहे. सलूख सत्वरच होऊन दिलीचा बंदोबस्त करितो. आम्ही रायेपुरास येणार होतो. परंतु दिलीकडेस जावयाची जलदी जाहाली आहे. आम्ही जातो. तुम्ही व राजश्री बालाजी गोविंद व राजश्री गणेश संभाजी अंतरवेदींत उतरोन बंदोबस्त करणें. कमावीसदारांसहि पत्रे पाठविली आहेत म्हणून सुभेदारांनी लिहिलें होते ती पत्रे बजिनस रामाजीपंत याणी पाहिली आहेत. त्यास तुम्ही आजपावेतो धीर धरून नक्षोंनसी राहिला. त्यास संवत्सर प्रतिपदेच्या मुहुर्ते यमुनापार प्रस्तान काढून उतरत आहो. तुम्ही आम्ही एकत्र होऊन अनुक्रमे तुम्हापासोन ठाणी बसवीत जाऊ. बालाजीपंत पार उतरत आहेत किंवा उतरले असतील. तुम्ही सिजेपावेतो राहिला, पुढे निवेपावेतो उतावली न करावी. याजउपरी अंतरवेदींतील ठाणीं पार उतरताच खाली होऊन गंगापार जात आहेत. आपण चिंता न करावी. अकबरपूरांत पाच चार दिवसांत जाऊन बसाल. द्वितीयेस आम्ही रायेपुरास जाणार आहो. तेथे गेल्यास तेथूनच उतरावयाचा विचार ठरल्यास आपणास लिहून पाठऊन. येका दोन रोजात येथेच तजवीज ठरल्यास त्याजसारखे आपणास पत्र पाठऊ. कळले पाहिजे. आपण मोठा इस्तकलाळ केला. मोठी गोष्ट गेली. आता तर फलादेश आहे. सत्वरच पार उतरून. कळले पाहिजे. बहुत काय लिहिणे कृपा कीजे हे विनंती.