Selections from the Peshwa Daftar 29.71: [Recd. 10-7-1757] Report addressed probably to Raghunathrao about Maratha activities and the enemy's movements in the Doab across the Jumna.
Selections from the Peshwa Daftar 29.71
- Language
- Marathi
29.71
पौ छ २२ रावल
श्री
विनंती उपरी, बुधवारीं तिसरे प्रहरीं पाऊस मात्र उघडला. रात्रीस पाऊस उघडतो तरी प्रातःकाली कूच करून रा तात्या आम्ही आठ कोस जातों. अंतर नाही. दर कूच जातो. रा सुभेदाराची पत्रें ३ सोमवारचे मंगळवारचे रविवारचे दो दो दिवसाची आली. जगहाजखान गंगापार फरकाबादेच्या सुमारेच आहे. इकडे उतरत नाहीं. गङमु(क्ते)श्वरी येऊ पोचत नाही. आमची आवई गेली कीं, गडमुक्तेश्वरापर्यंत फौजानी घाट बांधले. आता जगहाजखानाची बंदोबस्ती तरी इकडे नाही. परंतु नजीबखानाच्या कबिल्या खजिनियाची खबर स्वामिनी लिहिली. तरी आम्ही तरी जातच आहो. परंतु मध्ये पावसाची झड जे दिवशी लागेल ते दिवशी विलाज नाहीं. व ज्यास खजिना बायका लावणे ते काही बेवकूफ नाहीत. गनीमच तेहि नाहीत. दो दिवसात चाळीस कोस निघोन गंगापार आपल्या ठिका(णा)स जातील. मध्ये कैसे राहतात ? असो. आम्ही आज्ञेप्रमाणे जातो. आपण राजे नागरमलाचे मारफातीने वजिरास वरचेवरी बोलाऊ पाठवावे. परंतु त्रिंबकपंत सुभेदार आहे, त्याची काही तरी मालुमात लिहीत जावी. केवळ निर्माल्य नसावे. त्याचे नावच कागदीपत्री नसले तरी काय करावे ? याचा विचार काय ? तरी आम्ही तरी, इकडे स्वामी पत्रे पाठवितील, त्यात सुभेदारास पत्र व वजिराचे पत्री त्याची मालुमात ल्याहावी. आपणहि लौकर यावे. बहुत काय लिहिणे हे विनंती.
---