Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.72: [28-9-1764] Holkar is advised to support the Jat should his assistance be solicited by either of the two, Najibkhan or Jawahirmal between whom deadly hostilities have sprung up.

Selections from the Peshwa Daftar 29.72

Language
Marathi

29.72

होलकरास पत्र.

श्रीहेरंब

जाटाची व नजीबखानाची आदावत पडोन उभयेतात फारच कलह वाढला आहे. दोघेहि लढाईची तरतूद करितात. तुम्हास सामील करून घ्यावयाची साधने दोघेहि करीत असतील. वकील आले असतीलच. त्यास आपणास जो मनसुबा युक्त आणि सरकारकामाचा दिसेल तोच करितील. जाटाची नेकी

4188 सरकारात कैसी आहे हेहि तुम्ही जाणतच आहा. नजीबखा कोणेप्रकारें सरकारात रुजू आहे तेहि जाणता. त्यास सर्वथैव जाटाचे साहित्य करणे. यात त्याचे निष्ठेचे स्मरण व मनसुबास उपयोग आणि नफाहि आहे. यास्तव जाटाचे ठिकाणी ममता धरून याचे साहित्य करावे. इकडील मर्जी व तुम्हासाहि याच अन्वयाचे आगत्य आहे व उपयोगी प्रकार हाच आहे. कामाची आणि चांगली तन्हा करावी. छ २ रबिलावल सु॥ खमस आस्विन.

Discussed in (1)