Selections from the Peshwa Daftar 29.73: [7-10-1764] Krishnarao Bhaskar sends news from Delhi about the preparations being made by Najibkhan and Jawahirmal the Jat for a severe struggle.
Selections from the Peshwa Daftar 29.73
- Language
- Marathi
29.73
**श्रीव्यंकटेश**
श्रीमंत माहाराज राजश्री दादा-
साहेब स्वामी राजाचे सेवेसी
सेवक कृष्णराव भास्कर हरकारे पादशाही रिकाबसा आदत व सुबे आवरंगाबाद सा॥ नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल ता॥ छ ११ माहे रबिलाखर जानऊण स्वामी राजाही निजानंदवैभव लेखकास आज्ञा करीत गेले पाहिजे विशेश. पूर्वी दोन तीन विनंतीपत्रे येथील सविस्तर वर्तमानाची सेवेसी पाठविली. सांप्रतचे वर्तमान छ मार परियेंत ऐसेजे, पृथवीपति प्रधानासहित छ २९ रबिलावल परियेंत कसबे बालासरांत मुकामात आहेत. सवाल जेबाब मामलत सुलहचा ज्याफर अलीखान सुबदार बंगाला व फिरंगियाकडून आहे. वर्जीर निगोदास्तसिपाह करितात, व सुरजमल जाटाचा पुत्र जवाहरसिंग तीस पसतीस हजार स्वार प्याद्याचे जेमियतेनें जोधगराहून कूच करून बलंबगडाआलीकडे तीन कोस येऊन मुकाम केला. तेथून अमरागीर चेला गोसावी व रामकृष्ण महंत वगैरे सरदारास पुढे मुरशदाबादेपासी पाठविले. तेथे त्यास कायम करून आपन मागती बलंमगडास जाऊन बलंमगडनी मजबुती उत्तम प्रकारे केली. आपले समागमी तोफखान्याचे सरदार विस्त्रासुख गडमजकूरचे निगेबानीसाठी ठेविले. तदनंतर तेथून कूच करून फरिदाबादेस आले. तळ्यावर स्नान करून दानधर्म ब्राम्हणास करून फरिदाबादेस उजवे टाकून येमुनातिरावर येऊन उतरला मकान युधे करायाचा पाहून तोफखाना जिनंसी तेथे उतरविला. हे वर्तमान नवाब नजीबखान बक्षीजीस पावतांच याही नासीरखान दराती रोहिल्यास बँजमियत स्वार प्यादे खिजराबादेस पाठविले व आनीक सरदार रोहिले त्यास लिहिले की, खानमजकुराची कुमक करणे व नवाब मजकूर हा दिलीकडे नजदीक मडई नमक ? जाऊन उतरले. नवाब नजीबखानाबो फौज मातबर तीस चाळीस हजार स्वार व या वेगला तोफखाना जमा जाला आहे. जाटासी व नवाबाचे फौजेसी फार्ंसला एक मजलेचा राहिला आहे. नवाब मजकूरहि आपले ठाई बलवंत आहे. युधेप्रसं(ग) एका दो दिवसा होनार व मल्हारराव होळकर सुभेदाराचे वर्तमान आले की, जोगनेर सांमराजवळ आहेत. राजे माधोसिंगासी जाबसाल सुलहचा दरम्यान आहे व शाहा आबदाली याचे वर्तमान आले कीं, शाहा मजकूर कंधारेत आहे. मेघराज वकील नवाब नजीबदौला जेमूचे पाहडांत पोहोचला. आबदालियापासीं जाबस्वालास गेला आहे. सांप्रत सिखाचे सरदार चेलागुरू संस्थानास गेले आहेत. दिपवाली जालियावर मागती लाहोर प्रांतास येणार. वरकड वर्तमान यथांस्थित आसे. माहाराजाही विनंतीपत्राचे उत्तर पाठऊन तोशवीत गेले पाहिजे. सेवक पदरचा आहे. रो बाबूराव सेवकाचे नायेब आवborder-abaदेस हरकारगिरीचे कामावर आहेत त्यावर कृपा असो द्यावी. त्याचे विनंतीप्रमाणे साहित्य पुरविले पाहिजे. विशेष काय लिहीन. कृपा निरंतर असो द्यावी हे विनंती.
[१ रबिलाखर असावें. २ फौजभरती. ३ बंदोबस्त. ४ सैन्यासह. ५ अवजड तोफखाना.]
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English