Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.74: [18-11-1764 ?] Naro Shankar instructs Khandopant and Chimanajipant to attack Jhansi.

Selections from the Peshwa Daftar 29.74

Language
Marathi

29.74

@P श्री

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री खंडोपंत व राजश्री चिमणाजीपंत स्वामी गोसांवी यांसी

सेवक नारो शंकर सा नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल ता॥ छ २३ जमादिलावल मुकाम पेडगाव भीमा दक्षनतीर जाणून स्वकीयें लिहिणे विशेष. इकडील वर्तमान सविस्तर चिरंजीव राऊजीचे पत्रीं लिहिलें असें. त्याप्रमाणें तुम्ही जलदीनें झांसींस जाऊन दोन्ही स्थले हस्तगत करून मालव्याचा बंदबस्त उतम प्रकारे करणे. सिरोंज अहीरवाडा येथील मामलतीची सनद सरकारची पाठविली असे तेथील बंदबस्त करणे. पा इंदोर पा कदवा ? पा अथई खेडा तिन्ही तालुके राजश्री विठ्ठलराऊ तात्या याणी आपल्या जिमेस केले आहेत. तेथे शाहणा माणूस ठेऊन बंदबस्त करणें. गणेश संभाजीने बखेडा केला आहे तरी तुम्ही इजेतखान सुज्याखान व अहीर ऐसा जमाव भारी करून वोडसेवाले दतियेवाले वगैरे मदनसिंग यास सामील करून घेऊन जबरदस्ती पोहचाऊन स्थले हस्तगत करून घेणे. गंगापुरी गोसावी यास तजविजेने हाताखाली घेऊन जमायेत गोऊन आपला मतलब करून घेणे. उपरांतिक त्याचे वर्तणुकेप्रमाणें तुम्हीं करावयास न चुकणें. राजश्री गोपाल केशव व चिरंजीव राजश्री माधवराऊ याचे समाधान करणें. माधवरायास सेव्हे याचे काम सांगणे. आपल्याकडील वर्तमान वरचेवरी लिहोन पाठविणे. बहुत काये लिहिणे हे विनंती.

[१ फासला = अंतर.]