Selections from the Peshwa Daftar 29.75: [8-11-1767] Ramchandra Shamraj requests Vishwasrao Lakshman to arrange for the safe journey as far as Kalpi of one Prananath Puranik proceeding to Benares and refers to the evacuation of Kalpi Raipur and other posts by the Jat. He further adds that Jawahirsing is on march to Pushkar.
Selections from the Peshwa Daftar 29.75
- Language
- Marathi
29.75
पौ छ १ रजब
श्री
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री
विस्वासराऊजी स्वामीचे सेवेसी
पों रामचंद्र सामराज कृतानेक सां नमस्कार विनंती. येथील कुशल ता छ १९ जमादिलाखर मुा सिवपुरी जाणून स्वकीये कुशल लेखनाज्ञा करीत गेले पाहिजे विशेष. आपणाकडील सांप्रत पत्र येऊन परामर्श होत नाही तरी जैसे न करावे. निरंतर पत्र पाठऊन सांभाळ केला पाहिजे. यानंतर वेदशास्त्रसंपन्न राजश्री प्राणनाथ पुराणिक कासीकर आम्हाजवळ दोन तीन वरसे होते. सांप्रत श्रीकासीस जातात. याजसमागमें कालपीपर्यंत दोस माणसे देऊन पोहचते केले पाहिजे. कालपी व रायेपूर डभुवा येथील ठाणी जाटाची उठोन गेली. राजश्री बालाजी गोविंद याची व आपली ठाणी पूर्ववत्प्राा काईम जाली म्हणौन गालेरीहून लिहिले आले. हा नक्षच जाला. जाट सांप्रतः पुष्कराकडे चालिला आहे. राजे बिजेसिंग रा(ये)ठोर याची भेटी घेऊन मातबर मनसुबियाच्या विचारात आहेत. पुराणिकबावास छेत्रपूर कालपीकडे सुभेता आसेल उतम मार्गे राा करावे. लोभ आसो दीजे हे विनंती.
पो धोंडो पद्माजी कृतानेक सां दंडवत विनंती. बहुत दिवस पत्री सांभाल न जाला जैसे नसावे. आम्ही पदरीचे आसो. सदैव पत्री सांभाल करीत आसावे. सर्व भरोसा आपला आहे. बहुत काय लिहिणे ? लोभ आसो दीजे हे विनंती.