Selections from the Peshwa Daftar 29.76: [18-12-1764] Raghunathrao receives money from Damaji Gaikwad for his army expenses and therefore asks Nana Fadnis to write it off the account.
Selections from the Peshwa Daftar 29.76
- Language
- Marathi
29.76
श्री
राजश्रिया विराजित राजमान्य
राजश्री बालाजी जनार्दन स्वामी
गोसावी यांसी.
पो रघुनाथ बाजीराव नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीये लिहीत जाणे विशेष. राजश्री दमाजी गायकवाड शेनाखासखेल समसेरबाहादर याजकडे साल मजकूरचा येवज सवापाच लक्ष रुो येणे त्यापौ येवजाची नेमणूक जिकडील तिकडे होऊन बाकी अजमासे सवादोन लक्ष रुो येणे. त्यास खासा स्वारीचे फौजेस नालबंदीस येवज पाहिजे याजकरिता सदरहू येवज हजूर आणविला असे तर या येवजावर तुम्ही गायकवाडावर वरात कोणाची न करणे. येथे कागद गढ्याचा तोटा आंहे. त्यास सांडणीस्वार पाठविला आहे तर कागद गढ्या
१० थोर कीर्दीच्या
१० मद गढ्या
येकून वीस गढ्या कागद सत्वर पाठऊन देणे राा छ २४ जमादिलाखर सु॥ खमस सितैन मया व अलफ बहुत काय लिहिणे हे विनंती.