Selections from the Peshwa Daftar 29.77: [1764 ?] Peshwa's orders restraining Naro Krishna are solicited.
Selections from the Peshwa Daftar 29.77
- Language
- Marathi
29.77
पो छ २४ रोवल
श्री
पु॥ श्रीमंत राजश्री साहेबाचे सेवेसी
विज्ञापना येशीजे माहादजी शिंदे यानी केदारजी सिंदे यास पुढे पाठविले. तेसमई त्यानी माहालोमाहाली घासदाण्याचे रोखे केले येसे राजश्री नारो कृष्ण दरखे सांगतात. कोठे काये घेतले हे ठिकाण लागत नाही. यागी होऊन त्याची संख्या माणसात आहे येसे नाहीं. गुदस्ता राजश्री आंताजीराम माजी कादार पाा येदलाबाज याजपासून सातहजार रुपये वैशाख मासी घेतले आसोन सांप्रतकाले धावचा देशमुख व पाटील यासी मसाले करून परगण्यात दंगा मांडला आहे. बराणपुरास धरून नेहले आहेत. परगण्यात राऊत पाठविले आहेत. त्याजमुळे परगणा उज्याड होतो. आखेर धण्याचा माहाल उपद्रव लागल्याने खराबी होईल. त्यांच्या रावतासी व आमच्यासी कटकट होईल. खावंद शब्द लावितींल तरी मारनिलास ताकीद करावी जे परगण्यास उपद्रव दिल्हा तरी तुम्ही जाणा येविसी निक्षूण आज्ञा करावी. सेवेसी श्रुत होय. राजश्री नारो कृष्ण दरखे यासी ताकीदपत्र सरकारचे येदलाबादविसी देवावे जे येवज घेतला असल तो माघारा देणे. फिरून परगण्याच्या वाटे न जाणे म्हणोन आज्ञा आसावी. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
[4192]