Selections from the Peshwa Daftar 29.78: [1764 ?] The writer gives news about Avachitrao arriving in Poona, Mahadji Sindia settling the question of appointing a Diwan. The letter shows that Mahadaji was getting gradually powerful at the court of the Peshwa at Poona.
Selections from the Peshwa Daftar 29.78
- Language
- Marathi
29.78
श्री
पु॥ विज्ञापना. राजकी वर्तमान रा॥ अवचितराव द्वादशी शुक्रवारी येथे दाखल जाहाले. प्रथम श्रीमंत नाँनासाहेबाची भेटी घेऊन मग श्रीपतराव साहेबास भेटले. मग तेथून वाडीकडे येऊन त्याचेच घरी राहिले. बराबर कारकून मंडली व दोनतीनसे स्वार कारखाना सर्व नदीपलीकडे राहिला. रावजी सडे जातीने येथेच वाडीला जी वसरीवर खोली होती ते दिवसी तेथे राहिले. भोजनस्नान सर्व येथेच होत आहे. रा॥ महादजी सिंदे व केदारजी सिंदे घोडनदीवरी सोडून हे पुढे आले. ते सोमवारी येथे येणार. मुहूर्त भेटीचा सोमवारी काढिला आहे. अजी कोरगावचा मुकाम, उदईक येथे येणार. रावजीची भेटी आम्हीही घेतली. वर्तमान (सविस्तर निवेदन) करावे तर त्यासी आवकाश नाही. दुपारे नानासाहेबांचे घरी राहिले. फार येकांती बोलावे तर कार्यात पडत नाहीं. संधि पाहून सर्व निवेदन करू. दुसरे रावजीच्या बोलण्यांत भाव दिसतो कीं माहादजी सिंदे आम्ही येकचित आहो. बाजी नरसिंह याजला राजी नाहीत. त्यासी माहादजीबावा येथे आल्यावरी काय ठरेल ते पाहणे. बाजी नरसिंह याने पाच लाख रु॥ नख्त भरले. श्रीपतरावसाहेबास अभिमान बाजी नरसिंह याचा आहे. मग सिंदे आल्यावरी कोणास हाता धरून दिवाणगिरी सांगतात पाहणे, माहादाजीबाबा ज्याजला हाती धरतील त्याजला दिवाणगिरी सांगावी येसे सरकारचे मानस. रावजी दैववान आहेत मागाहून काय निश्चयात येईल ते लिहूं. मुख्य गोष्ट रावजीचे कल्याण असावे. रा॥ गंगाधरपंत तात्या व नानासाहेब दोहीकडेहि वाजवयासी सिध आहेत. जिकडे सरकारचा डौल पडेल तिकडे हात लावितील, अभिमानी पुरुष नाहीत, दामुष्यायेशी आहेत. येथे सिंदे आल्यावरी रवाणगीहि सत्वरीच होईल. फौजा फालगुण मासी मालव्यात येतील. आम्ही आपल्याविषयी राा बापूस विनंती केली, त्यानी उतर केले कीं तुम्हाकडे राा नारो शंकर राजेबहादर याचा काहीं वरातेचा लढा असिला तर तितका मात्र तुम्ही वारणें. मग तुम्हास काही चिंता नाही. त्यासी ताकीद करणे ते केलीच आहे. मागती राा तात्यास व सिंदे यासी करूं. नानांचा कजिया ठेविला तर ते कजिया करितील. जर त्याजला तुम्हाकडून रुो पावले असतील, मग ते कजिया करितील तर येथून ताकीद करून तुम्ही त्याचे समाधान करणे तसे करावे वरकड मामलतींचा प्रकार तुमचा तुम्ही केल्या गुंता (नाहीं)? यैसे भाषण जाहालें. तुम्ही सतोटीस उतरल्या किमपि दुसरा अर्थ होणार नाही. मोटेविषयीं विनंति केली. त्यानी उतर दिल्हे कीं, पहिले श्रीमंत दादासाहेबी येलचेत जाहागीर दिल्ही तेव्हा मोट जाहागीरीत लाऊन दिल्ही ते परिछिन्न कागदपत्र पाहिले. गोसावी सिरत होता त्यासाठी तुम्ही राखिली, उत्तम केले. आता त्यासी देणे. सिबंदी जे पडली असेल वाजवी ते देतील. तुम्ही जाहीगिरीपैकी येवज घेतला असेल तो माघारे देणे, दुराग्रहात न पडणे. आम्ही विनंती जे करणे ते केली. उतर केले की वडिलासी केवळच बिघडावे यैसे नाही. त्याची कृपा संभाळून घ्यावी, यात तुमचे कल्याण. याप्रकारचा जाबसाल जाहाला. वरकड मागाहून सविस्तर लिहूं. हुंड्यांचे वर्तमान निश्चयात आले नाही. मागाहून येईल त्याप्रो लिहूं. आपण पनास हजाराच्या हुंड्या जलद पाठविल्या पाहिजेत. दरबार खर्चाचाहि येवज पाठवणे हे विज्ञापना.
[१ नारोशंकर हा सिंद्याचा कारभारी कांहीं काळ होता. २ महादजीचा कारभारी.]