Selections from the Peshwa Daftar 29.79: [1764 ?] This fragmentary letter contains the instructions of some Hindu Prince who has sent his envoy to the Peshwa's court. Suggestions are made that the Marathas could easily reassert themselves in the North against Najibkhan and Shuja-ud-daula if they agree to act in concert with Jawahirmal, son of Suraj
Selections from the Peshwa Daftar 29.79
- Language
- Marathi
29.79
श्री
आमचे तर्फेनें श्रीमंत राजश्रीरघुनाथपंत याजपासी जाऊन त्याची व सखारामपंत त्यांचे दिवाण यांच्या भेटी घेऊन आमचे तर्फेनें सांगणें कीं तुमचा आमचा भाईपना कदीम व पागोटें बांधले याची शरम उभयपक्षीं आगत्य आहे. भाऊसाहेब व जनकोजी व दत्ताजी याणी आम्हासी गरसलूक केला म्हणून काम या थरास पोहचले. ईश्वर तुम्हास सलामत राखो. तुम्ही अम्हासी स्नेह पहिलेपासून एकसारिखाच आजवर चालवीत अहां. पहिले तुम्हास अवदाली व आली गौहर व नजीबखान याच्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या तुम्हासी स्मरण असतील. परिणाम तदनुसार घडोन आला. त्यांची कर्में दगाबाजीचीं प्रसिद्ध आहेत. सांप्रत्ये सुरजमणी याजला नजीबखान यास कौल दिलासा देऊन बोलावून मारून टाकिले. आतां हिंदोस्तानांत तुमचा स्नेही व हिंदु आम्हा-वेगळा व सुरजमणाचे पुत्रावेगळा आणिक कोन्ही नाहीं. आम्ही पूर्व स्नेहावर व भाईपनावर द्रिष्ट ठेविली आहे व सुरजमनाचे पुत्र यासी वर्णाश्रम विचारें तुम्हीं यास श्रेष्ठ व सपूस्ये अहा व शत्रूचे पारिपत्यहि तुमचे साहेतेन होणार याची पूर्ण निष्ठा तुमचे ठाई आहे विशेष. दक्षगेचे सरदार दगाबाज व फुंदी तुम्हासी सदैव शत्रुत्व चालवितात. दरसाल दक्षगेची मोहीम तुम्हास पुरवती. फार दिवस जालेत की या मुलुकांतील आमल व बंदोबस्त उठला. चार वर्षे झालीत कीं मुबदला न जाला. यामुळे मुदई दिवसानांदवस अधिक जोर धरितात. निर्भर जालेत. जर दक्षनेचे कामाविषयीं तुमची खातरजमा असली तर तुम्ही मातबर फौजेनसी इकडे येणे. सुरजमन याचे पुत्राजवळ खजाना फार आहे तेहि देतात व हाफीज रहिमतखान व सुरजमनाचे पुत्र व नबाब अहमदखान बहाद्दर गालीबजंग हे आमचे रफीक आहेत. अपणासी भेटल्यावर उत्तम प्रकारें बंदोबस्त हिंदोस्तानचा तुमचे चित्तानरूप घडोन येईल. अबदाली वगैरे याचे मनसुबे आपणापासी फार आहेत. अबदाली कांहीं मुजाहीम होणार नाहीं. श्रीकृपेकरूण हा जिमा आपला असे. अबदाली एकीकडे राहिल्यावर हे सरदार व आपण एकत्र जालियास सहजांत नजीबखान व सुजायतदवले याचे पारपत्य होईल. अगर दक्षगेविषयीं तुमची खातरजमा नसल, आम्हास आपणाजवळ बोलाव्बाल तर येऊन लौकरच मुद्याचे पारपत्ये करूण. श्रीकृपेकरूण हिंदोंस्तनचा बंदोबस्त उत्तम प्रकारें करूं. दक्षगेचा बंदोबस्त तुमचे चितानरूप जालिय पुढे तुम्हास चिरकालवरी सौख्यें विश्रांत आहे. उपाध बाकी राहात नाहीं. आम्हास बोलावाल् तर येविषयीं शाहावलीखान याचे लिहिले दस्तावेज बाहित्याकारचे अगत्त्य असल तर श्रीकृपेकरूण आपुले स्वाधीन असे.
[+ Near Jhansi.]
[१ स्नेही.]
Ca 73-10 कासम आळखिन बंगालेवाला याजपासीं आठ करोड रुपये खजाना आहे. पैकीं तीनसें हत्तीवर खजाना व पंधरा हजार फौजेनसी वारानसीजवळ आला आहे. त्यासहि आपणाजवळ बोलावोल तर तोहि येईल.