Selections from the Peshwa Daftar 29.80: [13-6-65 ?] Baji Ballal congratulates his master for the latter's prompt action in defending Jhansi.
Selections from the Peshwa Daftar 29.80
- Language
- Marathi
29.80
पौ छ २९ जिल्हेज
श्रीपंढरीनाथ
विनंती पोष्य बाजी बलाल सा नमस्कार विज्ञापना. येथील कुशल ता छ २३ जिल्हेज मुकाम झाशी शुक्रवार प्रहररात्रीपावेतो स्वामीचे कृपावलोकनेकरून यथास्थित असे विशेष. स्वामीनी पत्र पाठविलें तें पावून परम संतोष जाहाला. स्वामीनी दुर्गाचा समयावर बंदोबस्त केला. श्रीसांबदयेने व दृढप्रयत्ने स्वामीस यश आले. परम उत्तम जाहाले. पुढें निष्कन्मष राहें ते असावे. स्वाम सर्वज्ञ आहेत तेथे विस्तार किमर्थ ? मसुदे आपल्या पत्रापूर्वीच आपणाकडेस राजश्री आपाही पाठविले ते पावलेच असतील. श्रुत होय कृपा वर्धमान करा हे विज्ञापना.