Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.81: [May 1765] Letter from Malhar Tukdeo, the beginning and the end of which are unfortunately missing, reports situation in Rajputana where heavy fighting appears to be going on between Madhosing and one Sardarsing of Uniyar. Malharrao Holkar is active, investing Kota.

Selections from the Peshwa Daftar 29.81

Language
Marathi

29.81

(First sheet missing.)

श्री

पुरवणी साहेबाचे सेवेसी

तरी उणियारवाला सरदारसिंग नरुके यासी कजिया पेसजी लागला होता. त्याजवरोन त्याच्या तालुकियात राजसिंग चव्हाण गाव उज्याड करावयासी च्यार हजार फौजेनसी बिदा केले होते. ते मुलकात धूम करून होते. त्यांजकडील सलुखाचा पैगाम काहीच न ये. याजकरिता दिवान नंदलाल पाच हजार फौजेनसी पुढे बिदा केले. त्यामागून आपणच तोफखाना बाहेर काढोन वैशाख शुध १२ लग्नसिधि रतलामकर राजे येथ आहेत त्यासी सेरीरसमध करून ते दिवशींच कार्यसिधि करून कूच करून सांगानेरास दाखल होऊन मुकाम केला तेथून अर्जी झिलायेस जाणार. दोन तीन मेजमानिया तेथे होतील. तेथून पुढे उणियारेस जावे दबाव द्यावा पैगाम न आला तरी मोर्चे लाऊन घ्यावे हा विचार आहे. त्यासी सरदारसिंगजी याजकडून काली काही पैगाम लागला येसे वर्तमान आहे. पुढे जों जाबसाल होईल ते लिहीत असो. प्रस्तुत उणियारीवरी शेह दिल्हा. पुढें तेथून रणथंबोर किल्यास जाणार. रामपुऱ्याकड जावे हा विचार आहे. किला पाहून जे तरतूद करतील ते लिहीत असो. सोपारकर इंद्रसिंग येऊन सामील जाला तो बराबर आहे. त्याजवरी कृपा बहुत मसलतीत सामील. बुंधीचे हाडे येऊन सामील जाले. कोटे करोली खेचिराऊ यांचे येऊन सामील होणार. पुढे चाल करावी हे मानस आहे. राजश्री मल्हारजीबावा सुभेदार गांगरोणगडास मोर्चे लाऊन मुकाम करून आहे. कोट्यावरी शह घातला आहे. रांगड्यानी बहुत अधिक विचार आरंभिला होता. परंतु रामपूरा सरकारच्या फौजानी घेतला. हजारपाचेसे माणूस मारले. याजवरून दबाव बहुत पडिला. सुरतराम राम पोता इगलजगडाकड बिदा केला होता तो शेह भारी देखोन मुकुंदबारीपासोन माघारे सिरोन कोटियासी येऊन मुकाम करून आहेत. सांप्रत राजे बाहेर निघोन उणियारेयावरी चाल केली आहे. पुढें जो विचार ध्यानास येईल ते सविस्तर साहेबाचे शेवेसी लिहित जाऊ. राजे रामसिंग जयेपुरी आहेत. यासीहि बोलाविले आहे. दोचौदिवसानी कूच करून सामील होणार. राजे विजेंसिंगजी जोतपुरी आहेत. लाला * * * यानी सर्व मारवाडचा बंदोबस्त केला आहे. मेडत्याजवळ फौज ठेविली आहे. सांबरेचाहि बंदोबस्त करणार आहेत. राजश्री गोविंद कृष्ण अजमेरीचा बंदोबस्त उतम प्रकारे करून आहेत. नेणवियात राजश्री सदासिव गोपाल आहेत. ते हा कालवरी मजबुतीने आहेत. तेथे पैगाम (अपूर्ण).

4197

Discussed in (1)