Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.82: [27-1-1766?] Apaji Mahadeo reports disturbances in Bundelkhand.

Selections from the Peshwa Daftar 29.82

Language
Marathi

29.82

श्रीवरदहरिवरद

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री माहादाजीपंत

स्वामीचे सेवेसी

पो॥ आपाजी माहादेव सा॥ नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल ता॥ छ १९ माहे साबान मु॥ झासी येथे असो विशेष. आपण बहुता दिवशी स्मरणपूर्वक पत्र पाठविले तें पावले. श्रीमंत रा॥ रामचंद्रपंत तात्या ग्वालेरीस आले होते. येथून रा॥ रघुनाथ हरि याणी गृहस्त विसाजीराम ग्वालेरीस पाठविले होते. वस्त्रे सरदारीयोग्य सेलापागोटे किनखाप दोन महमुद्या याप्रमाणे पाठविली होतीं. झांसीवरून आणावे येसा विचार होता. परंतु तेच आले नाहीत. तेथे मुकाम बहुत होते. मागून रा॥ लक्ष्मणपंत येणार यास्तव त्यांची वाट पाहात राहिले होते. आलियावर दसर्‍यास निघोन दरमजल देशास गेले याप्रमाणे वर्तमान. दुसरे वोडसे येथील ठाणे रा॥ रघुनाथ हरि याणी घेतले. तेथील भेद लागला होता. स्वारी पाठऊन ठाणे खाली केले. तेथे पजनसिंग ठहरोलीकर होता तो घेऊन झासीस आणून ठेविला आहे. ठाणे आपले बसले यामुळे अष्टभया बुंदेले याणी ढुंडी आरंभीली आहे. त्यानंतर येथून फौज घेऊन कारभारी गेले आहेत. येथे कोणी बुंदेला राजा जाहल्याखेरीज बुंदेले * * डो देणार नाहीत. याविशी श्रीमंत राजश्री दादांसहि पत्रे पाठविली आहेत व पुण्यास पत्रे पाठविली आहेत. जैसी आज्ञा येईल त्याप्रमाणे वर्तणूक करितील. मल्हारजी होळकर याणीं राजा हटेसिंग बसविला तो दतियामध्ये आहे त्यास कोणी अष्टभया राजी नाहीत कोणी आहेत. दुसरा प्राणसिंग लुधोरावाला तोहि राजा होईन म्हणतो. त्याने ढुंडी आरंभीली आहे. तिसरा पजनसिंग वोडशामध्ये होता. तो झांसीस आणून ठेविला आहे. याउपरी श्रीमंत राजश्री दादा यांची आज्ञा होईल त्याप्रमाणे वर्तणूक करितील. उत्तरे येतील त्याप्रमाणे वर्तणूक करितील. श्रीमंतास पत्र लिहिले आहे. पावते करावे. देशीहून पत्र वीस रोजाचे आले होते. श्रीमंत रावसाहेब उभयता कच्छेश्वरानजीक गंगातिरी दक्षिणातिरी आहेत. नाना फडनीस वगैरे सर्व कारभारी समागमेच आहेत. रा॥ तात्या व रा॥ संपतराव त्रिंबकराव समागमेच आहेत. श्रीमंतास आराम चांगले जाहले म्हणोन वर्तमान आहे. रा॥ बाबूरावजीस पत्र पाठविले आहे. पावते करून सदैव कृपा करीत असावे. याप्रमाणे विनंती करावी. बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंती.