Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.83: [10-2-1765] Bhikaji Govind from Murshidabad writes how completely the Nawab Muzafar has been overshadowed by the English and requests Dada to send an expedition to Bengal.

Selections from the Peshwa Daftar 29.83

Language
Marathi

29.83

पो छ ३० सफर श्रावण

सन सीत सितैन.

श्रीराम

श्रीमंत राजेश्री दादासाहेबांचे सेवेसी

सेवानसेवक किंकर गोविंद भिकाजी कृतानेक सिरसाष्टांग नमस्कार विनंती उपरी. येथील वर्तमान माघ वद्य ९ पर्यंत मुकाम मकसुदाबादेत स्वामीच्या कृप्य करून सुखरूप असे विशेष. येथील वर्तमान पुरवी कासीद अजुरदार समागम्य सर्व समाचार लेहून पाठविले आहेत. सेवेसी पत्र पावली असतील किंवा पावतील. सांप्रत येथील वर्तमान तर हे सर्व पटन्याची लढाई फात्ख (?) करून सर्व सईन ठेऊन आपण जरिदा स्वार होऊन तांब्रमुखीने बालावून पाठविले होत यास्तव हे मजलदरमजल कलकत्यास गेले. ते च्यार महिनेपर्यंत राहिले होते. कितीक गोष्टीचा जाबसाले होता. तो सर्व फाइसल केला. बंदोबस्त जाहाला. येक ला(ख) पर्यंत रुपये कबूल केले. मग समसुदवला तांब्रमुखी याजपासून बिदा होऊन इलाइतीस गेला. कलकत्यात दुसरा साहेब जाहाला आहे. येथील अधपतिचे सर्व मालोक तांब्रमुखी आहेत. हे नावाचे मात्र धनी आहेत. येथील समाचार सर्व याजप्रकारचा आहे. त्यास जैसा रावनास गर्व जाहाला होतो त्याचा गर्वप्रहार श्रीरामचंद्रजींनी क्षणमात्र करून लंका इजय करून अईध्यक्ष पद अभिषाक होऊन राज्यश्रीस जाहाले त्याजप्रमान इश्वरान इकडील सर्व पदाधीश आपन आहेत. आम्ही लोक जैसा चातक प्रजनाचा मार्ग लक्षीत आहेत त्याजप्रमान आम्ही आपले सेवकजन रात्रंदिवस इश्वरापासी प्रार्थना करून निजध्यास करीत आहे. ईश्वर आम्हा लोकाची कामना कधीं सिधीस पावील तो दिवस सुदीन जानू. विशेष काये लेहू? परंतु हे काही आपनापुढे पदार्थ नाहीत. परंतु दूरचा डोंगर सौभिवंत दिसत आहे. याजप्रमान सर्व वर्तमान श्रुत होये. राजेश्री जाणोजीबावा याजकडून वकील मामलतीस राजेश्री रघुनाथपंत आले आहेत. चार पाच महिने जाहले. अदेप कांहीं मामलतीचा बंदोबस्त जाहाला नाही. सांप्रत वीस पंचवीस हजार रुपये मात्र अलला (?) हिसाब दिल्हा आहेत. लाऊन मात्र ठेविल आहे. सांप्रत त्याजला तांब्रमुखीसी येवज बहुत देन आहे. त्याजपुढे याची मामलत किसगनतीत आहे. त्यास उगच लाऊन ठेविले. परंतु कांहीं लक्षन मिलायाचे दिसत नाही. जर काही आपला हिंदुस्थानात दबाव जाहल्यास काही प्रपत हाविले नाहीतर प्रपत होता दिसत नाही. स्वामीच सेवेसी श्रुत होय यास्तव विनंती लिहिली आहे. विशेष अईथ्यवाल्याचा सर्व समाचार आपणास विदित जाहला असल किंवा राजेश्री धोंडोपंत याच्या पत्रावरून सर्व निवेदन होईल विशष.

[१ प्राप्ति होईल.]