Selections from the Peshwa Daftar 29.89: [Just after 13-4-1771] The news of an agreement with the Emperor and of his having started towards Delhi under Maratha protection is reported to the Peshwa.
Selections from the Peshwa Daftar 29.89
- Language
- Marathi
29.89
श्री
येथील वर्तमान पातशाहाकडील सैफुदी महंमदखान समागमे आहेत. त्याणी मामलतीचा करार केला. जुमाबक्ष पातशाजादे हाली बलीहत करितो. यास बाहेर काढून मुजरा करावा. चहुकडून वर्तमान पातशाहास जातील. खुसी मानून यावयाची तयारी करील. त्यावरून वलीहद यास छ ४ जिल्हेजी बाहेर काढून नजरा करून सारे सरदार जाऊन मजुरा करून आले. सैफुदींमहंमदखानाने मामलतीचा करार करून दिल्हा. चाळीस लाख रुपये द्यावे. मेरठ वगैरे आठ माहाल द्यावे. पातशाहास दोन महिनेयात येथे आणावे. कडाकुरा सोडावा; ते न होई तर मुबलक मुलुक दिलीजवळ द्यावा. चाळीस लाख रु॥ पैकी तूर्त शहरचा अमल आपले स्वाधीन करावा. वीस दिवसात दाहा लाख रु॥ द्यावे म्हणजे किला स्वाधीन करावा, तो पातशा येतील. ते आल्यावर जप्तीचे माहाल सोडून तेथील येवज मजुरा देऊन पंधरा लाख द्यावे. बाकी पंधरा लाख साता महिनेयात द्यावे याप्रो॥ याद करून वलीहदाची मोहर करून दिल्ही. वाइदा जाहला. तूर्त दाहा लाख यावे, त्यापैकी दोन लाख प्रयागाहून पातशाहाने हुंड्या दोन लाखाच्या पा॥ तीन लाख मागाहून पा॥ म्हणोन लि॥ आहे. पातशाचे छ २७ जिल्हेजी प्रयागाहून कूच जाले. दिलीस येतात याप्रमाणे वर्तमान आहे. प्रस्तुत शहरचा अमल सैफुदीमहंमदखान याजकडे करारप्रमाणे दिल्हा. किल्याचे पहिलयाप्रो॥ सरकारात बंदोबस्त करून राजश्री माधवराव सिवदेव तेथे पहिल्याप्रो॥ आहेत. दाहा लाख रुपये आले म्हणजे किला त्याचे स्वाधीन करावा. इतकियांत पातशाहा यावेसे आहेत. जाबतेखान शुक्रतालास आहेत. कल्दूमळून गंगापार आहेत. त्याचा कटाक्ष लागला आहे. जाबतेखानास दोहीकडून पायेबंद; आशात त्याणे काहीं सलुख करावा तर आपलेकडील मातबर आश्रा यामुळे सलुख करीत नाहीं. मुलकाची जप्ती जाली, परंतु पेंढारी याणी मुलुक मारून सत्यनास केला. जप्तीचा पैका यावासि बाकी राहिली नाहीं. जाटाचा सलुखच तूर्त राखिला आहे. पुढे काये होते ते पाहावे.