Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.90: [June-July 1765] The occupation of Prayag by the English and the abject surrender of the Emperor and Suja-ud-daula to their authority is reported. The letter further refers to the defeat of Malharrao Holkar.

Selections from the Peshwa Daftar 29.90

Language
Marathi

29.90

(पहिले दोन बंद गहाळ.)

प्रयागाचे किल्यात चारसे गोरा आहे. या देसचे माणूस कमी आहे. जेथे नाजूक जागा आहे तेथे आपले जातीचिच माणूस ठेवितो. किल्यात सत्ता दुसरियाची नाही. जेणेप्रो पातशाहास सांगावे तेणेप्रो करावे. सुज्यातदोल याचे चिरंजीव जाले आहेत. जे इंग्रज सांगेल तेणेप्रो करावे. दुसरे या प्रांती कोणी नाही. पाच माहाल सुज्यातदौलेयास इंग्रजाने दिल्हे आहेत तितके खाऊन बसावे इतके त्याचे स्वाधीन आहे. कलकत्यास पासून यमुनापावेतो अमेल इंग्रजाचा मधे, दुसरा कोणी नाहीं. पातशाहास चालीस लाख रुपये द्यावे ते कसकसे तरी बंगाल्याचे चोवीस, बाकी कुरा वगैरे प्रयाग मिलोन सोला याजप्रो द्यावे. बाकी काही नाहीं. सर्व आपण खातो. सुज्यातदोल व मल्हारबा वगैरे सर्व सरदार मिलोन कुन्यास आले. फौज लाख पावेतो होती. तेथे नज्‍यफअलीखान व फिरंगी गोरा पाचसे व या देसीचे तीन हजार व तोफा होल्या पाच सात हजार फौज याजप्रो याचा सरंजाम कमी असता लाख फौज मोडिली. याजकरिता इंग्रजास मराठे म्हणजे काही नाही असे हावभरी जाला आहे. परंतु बाजतबरसाद देसीहून सरंजाम चांगला आणून दिलीस जावे हे आहे. बाजारआवई प्रयाग देणे घेणे हे कठीण आहे. इंग्रज येक पाऊल जागा साधावी हे करील परंतु देणे हे त्याच्या वस्तु कठीण दिसते. येथील गंगेच्या उदकास विपर्यास रामनवमीचे दोन प्रहरापासून उदक हिरवे जाले. आत काही अनीक विपर्यास दिसतो. अस कधी जाल नाही म्हणून संभर वरषाचे माणूस येकादों आहे ते सांगते. बंगाल सारा इंग्रजाचे स्वाधीन. सर्व हिकडे याचे, दुसरे काही मध्ये कोणी नाही. जे आहे ते ते याचे स्तापित आहेत. या मुकामावरून प्रयाग सोला कोस येथून लस्कर ठेऊन पुढे जातो. येथे लस्करावर मी दाहा रोज आहे. याजवली येथे बारीक मोठे वर्तमान कळले. आम्हाकडील माणूस आहे ते वर्तमान सविस्तर सांगते. सर्व तिकडे यावयास उमेदवार बहुत आहे हे ल्‍हा याचा अंदेशा तेथे माझे स्नेही कोणी असतील ते म्हणतील की निलोपंताची देसी ल्‍हा तरी त्यास न कळत पते लाऊन मी ल्‍हा आहे. सुभेदाराकडील वकील येऊन फजीत पडून गेला असे न जाले. येक गोष्टीने तरी वकिलावरी सरफराजी केली आणि बाहेर जाहीरण्यात मराठ्यासी सलूक झाला याजप्रो इंग्रज येथे आहे आणि दुसरे मराठ्यासी ठीक केले असे आपले काम ठीक केले असे. येथे कारभारी मुनीरद्वला आहे. मारनिलेस खर्चास नाही म्हणून श्रमी होत होते. येथे कर्ज मिलत नाही. आणि दरबारखर्चास दोनसे पावेतो लागले. याखो राऊतास वगैरे खर्च भारी सर्व विकत घ्यावे (लागते?). सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.

4208