Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.91: [15-7-1765] Gangadhar Yeshvant to Raghunathrao begs to be excused for the little unavoidable delay in sending the stipulated amount. There was, he adds, no sufficient excuse for the addressee to realize the amount direct from Holkar's provinces. Pleading for the inability of the Holkar to pay off the Government

Selections from the Peshwa Daftar 29.91

Language
Marathi

29.91

पौ छ ५ रावल सन सीत शितैन भाद्रपद.

श्रीमोरया

श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामीचे सेवेसी

विनंती शेवक गंगाधर यशवंत कृतानेक सां नमस्कार विज्ञापना. येथील कुशल ता आषाढ कृष्ण त्रयोदसी मु॥ आलमपूर नजीक सेंवढे स्वामीचे कृपाकटाक्षें यथास्थित असे विशेष. छ ५ जिल्हेजचे आज्ञापत्र सादर केले ते छ १४ मोहरमी प्रविष्ट होऊन संतोषावाप्ति जाली. दिवाण देणियाचा येवज देणे तो मुदतीप्रमाणे पावला नाही. तुम्ही परभारे गेला. इकडे आम्ही येवज माहालातून घेतला म्हणून राजश्री मल्हारजी होळकर यानी (सी) कितेक प्रकारे लिहिले. त्यास मल्हारबा वाजबी सरकार देणियासी दिकत करतील हे होणे नाही. तुम्ही समजाऊन सांगितल्यास गुंता पडणार नाही. तूर्त येवज देविला तो सत्वर ताकीद होऊन सरकारात पावे ते करावे म्हणून आज्ञा. येसियासी येवजाविसी देसी आस्ता येवजाची विनंती केली त्याप्रमाणे पैसा पावला पाहिजे. या आशये स्वामिकार्यावर दृष्ट देऊन इकडे आलो. राजश्री सुभेदारास सविस्तरे विदित करून येवजाची रवानगी केली त्यास मार्गी पावता च्यार दिवस आधिक उणे लागले. पुढेहि रात्र दिवस बोलून खावंदाचे लक्ष राखावें याअन्वये होतो तो परभारे देसी येवज घेतल्याचे वर्तमाने परस्परे आली. हे गोष्ट लोकोपवाद पाहता अनुचित जाणून सुभेदार चितात बहुत खिन्न जाले. त्याचा परिहार विनंतीपत्री काये ल्याहावा? धण्यानि आजपर्यंत लौकिकांत प्रताप वाढवून लोकविरुद्ध प्रकार न घडला त्याप्रमाणे खावंदानी कृपा करीत जावी. सेवकांनी चाकरी(सीं) अंतर न करावे. आम्ही येथे नानाप्रकारें बोलावयासी कमी न केली. त्याचा विस्तार किती लेखन करावा? अस्तु आपण कायावाङ्मनःपूर्वक स्वामिकार्यावरी लीन आसो. दुसरा पदार्थ विशेष जाणत नाही. कृपा करणार साहेब समर्थ आहेत. येवजाविसी वारंवार बोलून उदेपूर येवजी साहा पावते करावयासी अगोदर लिहिले होते. आणीक च्यार येकूण दाहा सिवाये पथ्या द्या बाकी येणेप्रा॥ निक्षूणण ताकीदपत्रे पाठविली आहेत. जाटाकडील येवज तूर्त येत नाही. सरकारांत निकड जाणून प्रस्तुत हरतजवीज कर्जवाम करून त्या येवजी येवज द्यावा जैसा निकाल काढून राजश्री सुभेदारांनी गंगाजलनिर्मल अहिल्याबाई याजला लिहिले आहे, त्याप्रा॥ येवज पावेल. आम्हास स्वामिसेवेसिवाय रात्रंदिवस चिंतन दुसरे नाही. फलदाता श्री असे. सेवेसी श्रुत होये हे विज्ञाति.