Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.92: [3-8-1764] Naro Ballal Bhuskute requests Raghunathrao to reinforce Barwha without loss of time as the place is threatened by Mahadaji Sindia.

Selections from the Peshwa Daftar 29.92

Language
Marathi

29.92

पौ छ १३ सफर

खमस श्रावण

श्री

श्रीमंत राजश्री दादा

साहेब स्वामीचे सेवेसी

विनंती सेवक आज्ञाधारक नारो बलाल भुसकुटे कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. ताा छ ४ माहे सफर पावेतो प्रां मजकुरचे व सेवकाचे वर्तमान यथास्थित असे. यानंतर राजश्री माहादाजी सिंदे महेस्वरचे घाटे उतरोन उजनीस गेले. तेथे गेलियावर प्राा बढवे येथील किला व घरगावचे ठाणे घ्यावे. जासूद जोडी बातमीसहि आली होती की किलेयात स्वार प्यादे किती ते निघोन उजनीस गेली. इतकियांत आमचा ग्रहस्त उजनीस आहे, त्यासहि सिंदे याचे दरबारची बातमी पुर्ती लागली की दगा करून बढवे याचे ठाणे घ्यावे. त्यावरून त्या ग्रहस्ताने ताबडतोब पत्र पाठविले त्याची नकल सेवेसी करून पाठविली आहे त्यावरून विदित होईल. बढव्यात सिबंदीची नेमणूक स्वामीनी पाच हजार रुपये करून दिल्ही त्याचे शंभर प्यादे होतात. तितक्यानें किलेयाची व शहरची रखवालीहि होत नाही; तेव्हा मी जाजती दुसरे शंभर प्यादे व पंचवीस स्वार ठेऊन आजपावेतो प्रगणेचा बंदोबस्त केला, ही बातमी येताच दुसरे दोनसे प्यादे व पंचवीस स्वार नवे ठेऊन बढव्यास पाठविले आहेत; परंतु च्यारसे प्यादे व पनास स्वाराच्यानें ठाणे राहणार नाही. सिंदे दोन हजार स्वार व येकाधी तोफ काही प्यादे पाठविणार; तरी स्वामीनी तीनसे च्यारसे स्वार पत्रदर्शनी पाठवावे, व प्यादे दुसरे च्यारसे पाचसे ठेवावयासी परवानगी पाठवावी. सात आठसे प्यादे ठेवावे तेव्हा किला व शहर राहील. नाहीतरी ते ठाणे घेतील. आपण रागे भरतील यास्तव विनंती लिहिली आहे. केरोजी पवार पथक होते ते निघोन गेले हे सविस्तर पहिले सेवेसी लिहिले आहे. येथे राऊत पाठवावे ते नामांकित पथक मातबर पाठवावे. येथे प्रगणा राखोन राहातील यैसे पाठवावे. किलेयाची येकेक च्यार साडे च्यारसे हात यैशा च्यार भुजा बुरूज सिवाये किलेयासी दरवाजे दोन यैसा किला अफाट, सिवाये शहरपना प्यादे बहुत रखवालीस लागतात; यास्तव याची आज्ञा लौकर पाठवावी. किलेयात दारू दाहा मण व सिसे सा मण यैसे खरेदी करून ठेविले आहे. काही गला वगैरे

4210 जिनस बेगमी केली आहे; परंतु राऊतासिवाये व प्यादेयासिवाये बंदोबस्त होणार नाही. याची आज्ञा स्वार प्यादे यावयासी ढील लागल्यास ठाणे राहाता कठीण आहे; यास्तव त्वराच जाल्यास उत्तम आहे. हा बखेडा जाहला तरी मजला दोन महिने यावयासी कामास येणार नाही. याची आज्ञा तेहि ल्याहावी. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.