Selections from the Peshwa Daftar 29.93: [4-7-1767 ?] Raghunathrao orders Damaji Gaikwad to send forces to quell disturbances of Gopalrao Ganesh.
Selections from the Peshwa Daftar 29.93
- Language
- Marathi
29.93
श्री
राजश्री दमाजी गायकवाड सेनाखासखेल समशेरबहादर गोसावी यांसी
सकलगुणांलंकंरण अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य श्नो रघुनाथ बाजीराव आसीर्वाद विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखन करीत असिले पाहिजे विशेष. खासा स्वारी मातबर मोहिमेस हिंदुस्थानात आली असता समागमे आपण पांच हजार फौजेनसी यावें ते गोष्ट घडली नाही. राजश्री सयाजी गायकवाड समागमे होते ते गेले तेव्हां राजश्री रामचंद्र बसवंत तीन च्यार महिने होते. हाली आपणाकडील फौज म्हणावी तर आहे ती समजलीच आहे. गुदस्तांपासून फौजेस कर्ज रुपये दिले त्याचे ठिकाण नाही. सालगुदस्तांचे सवापाच लक्ष रुपये येणे त्याची निर्गत केली म्हणून आपले पन्नी मात्र लिहिलें आलें; परंतु येवजाचे वसुलास हुजहून रा। केसो बहिरव आहे त्याचे पत्र आले नाही. त्यास येवजाची रवानगी सत्वर करावी. राजश्री आपाजी गणेश येथून गेले त्यांचे मामलतींचे बंदोबस्ताचा मजकूर फार आगाध नव्हता, परंतु त्या कार्यास बहुत दिवस लागोन मागती कोण्ताहि मजकूर सेवटास गेला नाही. त्यास अतःपर त्यांचा अमल यथास्थित होये ते कार्य सत्वर करून श्रावण अखेर-पावेतो आपण तयारी करून फौजसहवर्तमान यावे. रा। रामचंद्र बसवंत यांस निरोप दिल्हा ते वेलेस येवज आणावयाकरिता हुजहून माणको वासुदेव कारकून दिल्हा आहे. त्यासमागमे येवजाची रवानगी करावी. रा। छ ७ सफर बहुत काय लिहिणे हे विनंती. गोपालरायाचे पारपत्य अद्यापि होत नाहीं हे अपूर्व आहे. हरतजवीज करून गोपालरायाचे पारपत्य करणे. मुलकाचा वसूल आपाजी गणेशाकडे चालल्यास शहरात किती दिवस दम धरील, शिबंदीस काये
Ca 78-12 देईल ऐसे तजविजेने हातास येईल. शहरातहि भेदाभेद केला तरी होइसा आहे. तुम्ही वाकीफ आहा. तुम्हास येथून ल्याहावेसे नाही. चार रुपये खर्चहि भेदास पडला तरी सरकारात कबूल असे. परंतु गोपालराव गणेशाचे पारपत्य उतम रितीने जाहालेच पाहिजे. तुमच्याने नच होये तरी खासा स्वारीस यावे लागेल. सरकारचा ऐवज तरी पाठविला असेलच परंतु हिंदुस्तानचा बंदोबस्त बहुत उठला आहे. खासा स्वारीहि बहुता दिवशी आली यास्तव तुम्ही हजूर येऊन शेवा करून दाखविल्यास उतम आहे. येविसी रामचंद्र बसवंताचे जबानीवरून कळेल. छ मजकूर बहुत काये लिहिणे हे विनंती.