Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.94: [29-7-1765 ?] Vishwasrao Lakshman appeals to Dadasaheb to send troops to restore order in his districts.

Selections from the Peshwa Daftar 29.94

Language
Marathi

29.94

श्रीशंकर

श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामीचे शेवेसी

विनंती सेवक विस्वासराव लक्षुमण कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील कुशल ता॥ छ १० सफर मु॥ किले कन्हेरा स्वामीचे प्रतापेकरून यथास्थित असे विशेष. या प्रांतीचे वर्तमान तरी तीन वर्षे जाहाली. किले मजकुरास आलो तो रा॥ बाबूराव कोनेर याणी किला शुष्क येक सेर धान्यदेखील नसता स्वाधीन केला. मुलकाची अवस्था म्हणावी तर तीन वर्ष राज्याणी व जमीदारानी येक रु॥ कोणास न देता स्थल बळकाऊन बसले आहेत. मातबर सरदार फौजसुधा कोन्ही येता तर रुजू होते तो प्रकार न जाहाला. गतवर्षीं रा॥ माहादजी सिंदे मारवाडप्रांतास आले. त्याजला बंदोबस्ताविशई कागदाचा खेत केला. निदानी रा॥ संताजी वाबले पाच सात हजार फौजेनसी पाठविले. त्याणी येऊन मुलुकात लुटफाट करून कोन्ही आडवे न येता भये खाऊन गछ करून गेले. त्याबरोबर आमची फौज दोन हजार उठून गेली. आम्ही त्याजबरोबर यावे तर सरकारचे स्थल कैसे सोडोन यावे ? खावंद शब्द ठेवितील यास्तव हजार राऊत दोन हजार प्यादयानसी राहाणे प्राप्त जाहाले. तदनंतर सविस्तर वर्तमान श्रीमंत पंतप्रधान स्वामीस व तीर्थस्वरूपास विनंतीपत्र लि॥ तेथून आज्ञा आली की दोन च्यार महिणे दम धरून राहाणे. मागाहून सरदार त्या प्रांताच्या बंदोबस्तास येतील. त्याजला तुमचे मामलतीच्या बंदोबस्ताविशई उतम प्रकारे सांगितले जाईल ते आज्ञेवरून सरदारांची मार्गप्रतीक्षा करीत राहिलो

4212 तो रा॥ मल्हारराव सुभेदार आले ते प्रमारे जैनगरच्या मुलकांत गेले. मागाहून रा॥ माहादजी सिंदे येणार हे वर्तमान आईकोन रा॥ विठल जानराव आगाव उजनीस पा॥ की कदाचित हेहि त्याजकडेस जैनगरास गेले तर आपला बंदोबस्त होणे कलतच आहे. बक्सी मारनिले येकमासपर्यंत उजनीत राहून मार्गप्रतीक्षा केली. त्यास रा॥ माहादजी सिंदे याचा प्रकार होणे तों हुजूरच जाहाला. फौज आणावयासी बक्सी गेले म्हणून मुलकात व राज्यासी दबाव होता. त्याजला दिवसगत लागल्याणे इकडील दबाव सुस्त पडला. आम्ही तीन वर्षे कर्ज खाऊन लोकाचा दंगा सोसून राहिलो त्याचे फळश्रुत काहीच न जाहाली. आता कोन्ही कर्जहि देत नाही. मागल्या कर्जाचा तगादा सावकार करितात आणि सिलेदार व किल्याचे लोक वगैरे रोज उठोन हंगामा करितात. कोन्ही दिवस धरणीपारणी केलियाविरहित जात नाही. निमित्य खावंदास विनंती लिहिली आहे की इकडील बंदोबस्ताविशई ज्यास आज्ञा जाहाली असेल त्याजला समक्ष आमचे उपरालियाची आज्ञा करावी अथवा त्याजला साहित्यपत्रे पाठवावी की त्याचा बंदोबस्त आधी करून देणे म्हणजे सेवकाचे राहिल्याचे सार्थक व सावकाराचे व लोकाचे देण्यापासून मुक्तता होईल. खावंदावेगले कोण परामृश करणार यास्तव विनंतीपत्र सेवेसी लिहिले आहे. कृपावंत होऊन जेणेकरून सेवकाचा आब राहे तो अर्थ खावंद करणार समर्थ आहेत. बहुत काय लिहिणे हे विज्ञात.