Selections from the Peshwa Daftar 29.95: [3-8-1765 ?] Mahipatrao Vishwanath, an officer of Naro Shankar, writes to Vishvasrao Lakshman of Jhansi, about difficulties in realising the revenue.
Selections from the Peshwa Daftar 29.95
- Language
- Marathi
29.95
[seal: श्री]
राजश्रियाविराजत राजमान्य राजश्री रावजी स्वामीचे सेवेसी
पो महिपतराव विश्वनाथ कृतानेक सा नमस्कार विनंती. येथील कुशल ता॥ छ १९ माहे सफर मु॥ कसबे वारणावा यथास्थित जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिले पाहिजे. तुम्ही पत्र पाठविले ते पावले. लेखनार्थ अवगत जाहला. पाच हजार रुपयेची वरात करीत होतो. परंतु राजश्री नांौनानी रद्दबदली करून राहविली आहे. त्यास रुपये सत्वर पाठवणे म्हणून आज्ञा.
[१ नारो शंकर.]
यैसियासी ठाणी उठली. येवज जमा जाहला होता तो पाठऊन दिल्हा. आम्ही लस्करांत बसलो आहो. येथे येवज कोणता आहे? लस्करांत रात्री चोरांची हुलड याजमुळे होता येवज तो पाठऊन दिल्हा. तूर्त ठाणी बसवावी म्हणून सरकारची- हि आज्ञा आणि येथील सरदारांनी सांगितले त्याजवरून छ १३ सफरी राजश्री दामोदरपंत समागमे पन्नास स्वार व शंभर प्यादे देऊन ठाणेस पाठविले. जमीदारासी सलुकच होता. ठाणे बसले. रोहिल्याचे दाहावीस प्यादे होते ते उठोन गेले. परंतु प्रगणेत बेतालसी गांवात तेरा गाव वाचले आहे. त्यांत पाच गावचे जरीब केले होते. केवलच धाकटी (?) परवानगी वस्तीस राहून सेते करितात. त्याचा दाणा करार करून काही घेतला आहे. काही त्याजकडे राहिला आहे. घेतला दाणा तो घरात भरून ठेविला होता. निघावयाचे गडबडीत जैसा गेला तैसा दोन तीनसे रुपयेचा दिल्हा. बाकी तैसाच राहिला. त्याची गत काये जाहिली ते पाहवी. दाहावीस ठाणेत प्यादे न्यामतसिंगाचे होते. गेला राहिला दाणा कळेळ. बाकी गावकर आहे. ते परगावी राहतात. गाडे पाठऊन देऊ. गला दिल्हा तरी उत्तम न दिल्हा तरी जबरदस्ती आसावी. तो विचार दाहा हजार फौज येथ आहे, परंतु यांचेनेहि काही होत नाही. तेरा गावापैकी पांंचा गावची येसी वाट आहे. सात गाव व कसबा, त्यास कसबा तो अगदी मिलका आहेत, खालसा पाच सातसे रुपये रबीचे बसतात, त्यापैकी कांही वसूल जाहला आहे. बाकी राहिली आहे. ती माहाल हे बाकी करील तेव्हा आम्हासीहि घेणे. गावच्या रबीचा पैसा नाही. आम्ही जवळ म्हणून निम्मे दिल्हे. आतां सर्व बरोबरी घेणे. हा त्याचा स्वालजाब सात गाव जे राहिले ते पके गढीबंद आहेत. या फौजेसहि मानीत नाहीत. तोफा आसत्या तरी मानीते. आम्हापासी त्यांच्या बोली होत्या तेव्हाहि बोलीची अस्ता सोडली म्हणून बोलत होते. आता तो बोलीहि त्याच्या सुटल्या(ची) चिठी देऊन स्वार पाठविले होते. गावांत घेत नाहींत येथून तीन कोसावर दोघट म्हणून अजाचे प्रगणेचा गाव आहे त्याजवळ मोकम करावयाविसी राजश्री त्रिंबक भास्कर व बगाजीपंत व अणखी सरदार आहेत. त्यास विनंती केली. परंतु त्यास अनकूल पडत नाही. तो गाव कांहीं तोफाविरहित बधत नाही. त्या गावची गुदस्ताचे रबीची जमा साडेसात हजार आहे. सालमजकूर पाच सातसे रुपये मात्र दिल्हे आहेत. पुढे वसूल विचार विचारे करीतच होतो. तोफा फौजेने आब तोडला. आता फिरोन गोष्ट सांगतात. त्याचप्रमाणे साती गाव गढीबंद आहेत. वसुलास
[१ मोजदाद.]
4214 हजार बारासे तीन हजार पावतॊ आहेत. दोघट तो भारी आहे. परंतु विना जबरदस्ती पैसा देत नाहीत यास उपाय काय करावा ? ठाणे मात्र बसले. आम्हीं येथे लस्करात अहो. येथून फौजेचे बले गावास तसदी करावी, जमीदार अणावे, या अन्वये बसलो. परंतु त्या गोष्टी येथे अगदीच नाहींत. वेतालीस गावात सात गाव जमेचे राहिले, त्याची वाट येसी आहे. आणि स्वामी तो म्हणतात जे पाच हजार रुपये देणे. त्यास येवज कोणता आहेत ? गाव तेच सालसुदीने पैसा देते तरी दाहा हजार रुपये सरकारांत पाठऊन देता. प्रस्तुत आमच्या अनोपाय जाहाला आहे. ठाणेत जाऊन सिवंदी मात्र वाढवावी. वसुलाचे काम बंद जाहाले. तोफा आल्यातरी वसूल होईल, दबाव बसल. आणखी ठाणी राहिली आहेत ती बसतील. बुढाणेत ठाणे पोवाराचे आठ दिवस गेले आहे. परंतु गढीत रोहिलेचे प्यादे बसले आहेत ते निघत नाहींत. त्यास जबरदस्तीने काढावे तेहि विचार संकटातच आहे. कोठेहि दबाव वसेनासा जाला आहे. याजमुळे गढीबंद गाव आहेत, ते बघत नाहीत. सारांश तोफा आल्यातरी काही कामकाज चालीस लागल. नाहीतरी काहीच होत नाही. ठाणी माघारी येतील. स्वामीस कळावे याजकरिता लिहिले असे. राजश्री त्रिंबक भास्कर यास आमचे साहित्याविसी सरकारचें पत्र अगत्यरूप पाठविले पाहिजे. बहुत काये लिहिणे. लोभ असो दीजे हे विनंती.