Selections from the Peshwa Daftar 29.96: [3-8-1765] Khanderao Raghunath informs Raghunathrao of the scuffle in which Mahadji Govind Kakde was killed.
Selections from the Peshwa Daftar 29.96
- Language
- Marathi
29.96
पौ छ २४ सफर.
श्रीगजानन.
श्रीमंत माहाराज राजेश्री दादासाहेब
स्वामीचे सेवेसी
विनंती. सेवक खंडेराव रघुनाथ कृतानेक सां नमस्कार विज्ञापना. येथील कुशल तागाईत छ १९ माहे सफर मु॥ अवंतिका क्षेत्र माहाराजाचे प्रतापेंकरून सेवकाचे वृत यथास्तित असे. यानंतर इकडील मजकूर तर रा महादाजी सिंदे यासी व सकूबाईसी भेट जाली. यानंतर फौजेची नालबंदी द्यावेयाचा करार उजेनीत होता. यासी येवज मालव्यातील प्रगणेयाची पुढले सालाची रसदीचा जमा करून नालबंदी दिली. परंतु फौज मोठी व येवज थोडका याजकरिता
4215 ९४
जितकी फौजेची समझाईस जाली तितक्यानसी रो। माहदजी सिंदे व सकूबाई पुढे
कूच करून कोत्या प्रांती अले. रो। बाजी नरसिंह व राघोराम व अच्युतराव
दिवान यानी माघे राहून लोकाची कर्जे घेऊन समग्र लोकास समझाईस करून
लस्करास जाणार होते. इतकियात रो। माहादाजी गोविंद याजला तीन लक्ष
रुपये देत होते ते न घेऊन इंदुरांस गेलेत व रो। त्रिंबकपंत अबा व गोविंदराव हे
उजेनीत होते व बाईची मोजमी याजला होती. यास्तव याजला माघारे घेऊन
जायास्तव रो। माहादाजी गोविंद हे माघारे उजेनीस अले व रो। अबा व गोविंदराव
याजला बरोबर घेऊन जावे. इतकियात गावकरासी व बिनेचे मनुशासी कजिया
जाला. त्यास गावकर येऊन या त्रिवर्गाजवळ फरियाद जालेत. यानी त्या
गोष्टीची सनद करून गांव मारले व लुटल्याचे नाव करून त्याजवरून आर्धरात्र
समई दग्याने जाऊन खासिरापेंटी खजान्याची त्यावर जाऊन पडले. लूट
पुजकल हाती लागली व रो। माहदाजी गोविंद याजला चार जखम लागले व
परिनाम शांत जालेत. काही जुज जाले नाही व मग जाऊन हे त्रिवर्ग सिंद्याचे
लस्करात गेले व कोत्याची मामलत पंधरा लक्षावर चुकली. त्यापैकी तूर्त पवणे
साहा लक्ष नगद व पोण लक्षाची हती घोडे वगैरे द्यावे याप्रा। करार होऊन यैवज
द्यावयास्तव राघो शंकर वगैरे मातबर गेले अहेत. यैवज वसूल जालियावर राजा
खुद भेटावयास येणार व स्नेह भाऊपण करणार व राजेश्री मल्हारजी होळकर
सुभेदार मोटेचे गडीस मोर्चे लाऊन बसले आहेत. फोज सात अठ हजार अहे.
वडसेकरानी घेतली याजकरिता दबाव देत अहे. राजा मात्रागमनी आहे,
यैकत नाही, सिंद्यासीहि वरचेवर बोलावतात व त्यास हेहि जाणार आहेत.
मारवाडेची [ अपूर्ण ].