Selections from the Peshwa Daftar 29.98: [25-8-1765] Chandrachud reports the development in the North particularly the abject surrender of Shuja-ud-daula to the English.
Selections from the Peshwa Daftar 29.98
- Language
- Marathi
29.98
पौ छ ७ रावल
श्रीमोरया
शेवसी विज्ञापना. नवाब सुजयातदौला यानी येऊन अनुपशहरचे मुकामी बहुत बाजीद होऊन दारमदार केला आणि फिरंगी याच्या पारपत्यास चलावे, आमचे साहाय्येकसून पातशाही बंदोबस्त सर्व तुम्ही आम्ही मिळून करावा याप्रमाणे ठहराऊन गेले. (या)प्रमाणे आम्ही थोर मनसबियावर नजर दे(ऊन) इटावाियाचे वगैरे काम सर्व येकीकडे ठे(ऊन) त्याचेच कामावर गेलो. रोहिले पठाणास * * * सामील करितों ते न आले. आपण मात्र येऊन सामील जाले. बिटुरीहून कूच करून जाजमदूस नेले. तेथून कुरा नजीक नजफखांन फौजसहवर्तमान त्यास तंबी करणे प्राप्त जाणून त्यासी गाठून हस्तगत केले. त्याउपरी मुकाम कुरियांसीच होते. प्रयागाकडून फिरंगी आलियावर लढाईचा प्रसंग पडला. कराराप्रा पैसा येणे तो न आला. रोहिले पठाण येऊन सामील न जाले. सेवट कालपीस बुनगे पावले तोपावतो बराबर आले. तेथे आम्हासी करार केला की मी फरोकाबादेस जाऊन पैसा आणिंतो आणि पठाण रोहिले याजला तुमचे सामीन करितो. आठा दिवसात फिरून येईन. आम्ही उचित जाणून त्यास आज्ञा दिल्ही. ते फरोकाबादेस गेले. तेथे आहामदखांन पठाण हाफिज रोहिले होते. त्यानी काही त्याचा सन्मान आगर जाबसाल सुधा न केला. सेवट त्यानी परिणाम जाणून याजकडील लक्ष सोडून * * शाहासच शरण गेले. तेथे इंगरेज वगैरे * * * * मारफातीने मुलाजमत केली. पातशा(हानी) सर्व त्याचा आन्याये माफ करून सर्फराजी केली. यानीहि नजरन्याज देऊ करून आपला प्रांत खेरीज प्रयाग चरनांल व कासी दरोबस्त सोडून घेतला. त्यांची मनुशे बरे * * हाफिजाचे जवळ होती तेहि त्यांनी आपल्या सुभ्यांत नेली. येकूण रोहिल्याचे त्याचे आंतर शुध नाही. त्याजकडील त्रिंबकदास खत्री वकील आम्हापासी आहे. त्याच्या विद्येमाने कागदपत्र येतात की मी त्याजवेगळा नाही. त्यासी बोल्याप्रमाणे वर्तणूक करीन ऐसी मिष्ट भाशेण मात्र करितात. तूर्त आम्ही इकडे छयावणीस आलो. दोन तीन महिने बरसांत तोपावेतो सारा भाव निदर्शनास येईल. त्याप्रमाणे बादजबरसात उपयोगी मनसबियांची योजना हो(ई)ल. शेवेसी श्रुत होय हे विज्ञाप्ति.
[+ पत्र होळकराकडील.]