Selections from the Peshwa Daftar 3.4: [30-5-1733]
Selections from the Peshwa Daftar 3.4
- Language
- Marathi
3.4
श्री.
पुरवणी राजश्री नाना स्वामीचे सेवेसी.
विनंती उपरी. दरबारीचे वर्तमान तरी राजश्री पंतप्रतिनिधी महाडास गेले होते. किले रायगडास चौकी श्रीमंत राजश्री पंत प्रधान व फतेसिंग बाबा याजकडील लोक सात आठशे येऊन अगोधर पाचाडी राहिले होते. त्याजकडे बोलीचाली होती. त्यावर राजश्री पंतप्रतिनिधी यानी राजश्री स्वामीस पत्र पाठविले कीं रायगडचे अनुसंधान आम्हाकडे आले आहे, यास काय आज्ञा ? यावरून राजश्री स्वामीनी राजश्री पंत प्रतिनिधी यांस पत्र पाठविले कीं तुम्ही किले रायगडचे राजकारण करून हस्तगत करणे त्यावरून महाडीहून प्रतिनिधी स्वार जाले ते छ २६ जिल्हेजी बुधवारी पाचाडास गेले ऐसे पत्र राजश्री स्वामीस आजि छ मजकूरी आले. याउपरि किले मजकूरचे राजकारण कोणाकडे लागेल याचे वर्तमान तहकीक आलियावर लिहून पाठऊन. विदित जाले पाहिजे. खुब नाईक (?) कालवातिणीची पोर पाठऊन दिली पाहिजे. नित्य नालिश होती. विदित जाले पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.