Selections from the Peshwa Daftar 3.5: [3-6-1733?] These two letters speak of the English at Bombay helping the Siddi and of naval help coming from Surat.
Selections from the Peshwa Daftar 3.5
- Language
- Marathi
3.5
श्री.
विनंती उपरी छ १ मोहरमी सोनाल्याचे बंदरावर इंग्रजाची गलबतें तीन आलीं. कांही लोक बाहेर निघाले होते. ही बातमी राजश्री चिमापास कळली. त्याजवरून रातोरात फौज पाठविली. त्यांची यांची गांठ पडली. लढाई चांगली जाली. बाणाचा मार आपले बाणदारानीं त्याजवर फार केला. त्याणीं जंबुर्र-याचे गोळे सुरू केले. अशी लढाई जमली. आणि आपले लोकानीं उठावणी केली, आंत मिसळले. से सत्राशे माणूस कापून काढिलें. कांही पळाले ते खाडीत बुडाले. इंग्रज कांहीं गलबतावर होते. त्याजवर बाण टाकिले. त्याणी खाडींत उड्या टाकिल्या. बुडाले. गलबत यानी जाळीले. गलबतांतील चीजबस्त यानी लुटून आणिली. आपले कडील दोन घोडी पडलीं, व दोन भले माणूस पडिले. व कांहीं जखमी जाले. या प्रो वर्तमान आहे. आपणांस कळावें म्हणून लिहिलें आहे. †
## 5a
@D [1733?
श्री
दिगर. सुरतेहून सिदी मसूद आरमार सुधां येतात म्हणून जाहीर होते. ऐशांस सिदी मारनिले आरमार देखील येत असतील तर त्यास मुंबईस नेऊन आपणा-जवळ ठेऊन बिसालतपन्हा सिदीसाद यांस मोहिबी कलमी करावे. जरी सिदी मारनिलेस आरमार सुधा अंजनवेलीस बोलावितील तर तेथे पाठवावे. अगर जंजिरा जावयाचे वा(या)वयाचे लिहितील तर जंजिरा पाठवावे. लेकीन बिसालता-पन्होंचा जबाब मोहिबास येइतैलम त्यास खोटी करावी.
[† हें पत्र वसई मोहिमेंतील असण्याचा संभव आहे.]
[१ स्नेद्याचा]
[२ येईपर्यंत.]
[३ थांबवून धरावें.]