Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 3.6: [4-6-1733?] Wasudeo Hari to Bajirao informing him how the Nizam was supporting Siddi Sat.

Selections from the Peshwa Daftar 3.6

Language
Marathi

3.6

पौ छ २ मोहरम

श्री

पुरवणी राजश्री पंत प्रधान

स्वामीचे सेवेसी.

विनंती उपरि नबाब निजामन मुलुक याणी इंग्रज यांस व सिदी साद यांस वस्त्रें पाठविलीं, तीं मुंबईस येऊन यांस पावलीं. ते दिवशीं वस्त्रें घेऊन इंग्रज याणी परम खुशाली केली, तोफा मारल्या. नोबती वाजविल्या. सिदी साद आद्याप मुंबईसच हजार दीड हजार माणसाणसी आहे. आपणास कळावें याकरितां लिहिलें असे. बहुत काय लिहिणें ? तादलाचे रवानगी हजार अडथले पडोन श्रमी केले आहे. निदान पावतील न पावतील कलत नाहीं. स्वामीचे पुण्यें करून पावतील. चिंता नाहीं. कललें पाहिजे हे विनंती.