Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 3.7: [12-6-1733] Letter from Chimaji, in his own hand, to Bajirao, communicating the changes in the commands contemplated by Shahu.

Selections from the Peshwa Daftar 3.7

Language
Marathi

3.7

छ १३ मोहरम.

श्री

आपत्यें चिमाजीने कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता॥ छ १० मोहरम मुकाम पुणे यथास्थित असे विशेष. रायगडावर निशाणें चढली यसें साताराहून लिहिले येथे आले, परंतु स्वामीकडून पत्र न आले. ऐसियास किला तो फते जालाच असेल; परंतु किल्यावर लोक कोणाचे गेले, किला सांप्रत स्वाधीन कोणाचे आहे, ते ल्याहावयास आज्ञा केली पाहिजे. रा॥ बापुजी गणेश आम्हाकडे राजश्री स्वामीनी पाठविले ते वर्तमान पूर्वी स्वामीस लिहिलेंच आहे. बापुजी पंताचे पाठीमागें संवेच राजश्री दादोबास आम्हाकडे पाठविले ते छ ८ मोहरमी येथें आले. आम्हांस व राजश्री पिलाजी जाधवराऊ यास साताऱ्यास बोलाविले आहे. तेथें गेल्यावर आम्हांस आपल्यापासी ठेवावें. पिलाजी जाधवराऊ यासी स्वामीकडे पाठवावे. ते तेथें आल्याने खटपट करितील व रा॥ सरखेलीसहि त्याचे हातून तेथें बोलाऊन आणावे तेहि उद्योगास लागतील ऐसा विचार चितात आणून आम्हास व त्यास बोलाविले. त्यास आपल्यास तो बरें वाटत नाहीं.

५

याकरितां राजश्री पिलाजी जाधवराऊ यास दादोबा समागमे सातारियास पाठवितों. तेथून लक्षा प्रकारें राजश्री स्वामी त्यास तुम्हाकडे रवाना करितील, ऐसा विचारच केला आहे. आपल्यास बरें वाटत नाहीं. तूर्त आपल्यास यावयास अनुकूल पडत नाहीं, याकरितां राजश्री पिलाजी जाधव रा॥ दादोबासमासगमे पाठविले आहेत. आपल्यास सावकाश वाटल्यावर आपणही सेवेसी येऊं, ऐसें उतर राजश्री नारबावास लिहून पाठविलें आहे, ते राजश्रीस विदित करितील. रा॥ दादोबा अद्याप येथेंच आहेत. सुभेदाराचा मुहुर्त करार होईल ते दिवशीं हे व ते समागमे जातील. जाले वर्तमान स्वामीस कळले असावे म्हणून लिहिलें असे. तीन च्यार दिवस येथून निघावयास लागतीलसे दिसते. हे विनंती.