Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 3.8: [18-6-1733?] Pilaji Jadhao writes to Bajirao that he is proceeding to the seat of war by orders of Shahu.

Selections from the Peshwa Daftar 3.8

Language
Marathi

3.8

पौ छ १६ मोहरम.

श्री.

राजश्री पंत प्रधान

गोसांवी यांसी.

॥ ६॥ श्रीसकल गुणालंकरण अखंडितलक्ष्मी आलंकृत राजमान्य स्नो॥ पिलाजी जाधवराव दंडवत विनंती. येथील क्षेम जाणून * * * * * लेखन आज्ञा केली पाहिजे विशेष. पत्र पाठविले ते व राजश्री आपास पत्रें पाठविली ती छ ११ मोहरमी पावलीं. कितेक विचार मसलतींचे तिडणाचे लिहिले ते कळो आले. याचा विचार उभयेता पोख्ता करून उत्तर पाठवणे म्हणोन लि॥. यैसियासी आम्ही छ ४ मोहरमी गावास येऊन पावलो. छ ५ मोहरमी राजश्री आपा पुणियास गेले

तो दुसरे रोजी राजश्री स्वामीची आज्ञापत्रें व रा॥ दादोबा आले. आज्ञा कीं हजार बाराशे लोक पायेउतारा करून व करोल बरकं(दा)ज यैसे राजपुरीस रवाना करून तुम्ही उभयेतां हुजूर येणे. त्यासी राजश्री आपाचे शरीरास सावकाश वाटत नाहीं. आम्ही राजश्री स्वामीस पत्र लिहून पाठविले आहे कीं लोक पायेउतारा घेऊन सातारियाकडून यावे तरी त्यामार्गे नया फार. दा बारा रोज लागणार. याकरितां आज्ञा होईल तरी याच मार्गे लोक घेऊन जाऊन म्हणून लिहिले आहे. त्याचे उत्तर आजी उद्या येईल. त्याप्रमाणे वर्तणूक करून. वरकड कित्येक अर्थ लिहिला तरी मनसबा कठीण पडला हे गोष्टी परंतु जे गोष्टीने राजश्री स्वामीचा आग्रह आहे ते गोष्ट न करितां गत्यंतरी नाही. त्याहि वरी राजश्री * * मनसबियास गेले आहेत. त्याची तुमची भेटी जालियावरी त्याच्या तुमच्या विचारे जो मनसबा होईल तो करावा. नाहीतेपक्षी त्याणी आजणवेलीस बसावे. तुम्ही तो राजपुरीस आहांच, वरकड विचार राजश्री आपानी लिहिला आहे त्यावरून विदित होईल. उताविलि करावी यैसे नाहीं तो सावे सातवे रोजी आम्ही येऊन पोहोचतो. भेटीनंतर जैसा विचार निघेल तैसा केला जाईल. कृपा केली पाहिजे हे विनंती.

[seal: शिक्का पिलाजी जाधवाचा]

[seal: मोर्तब]

सुद.