Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.31.7

Selections from the Peshwa Daftar 2.31.7

Language
Marathi

2.31.7

सुभेदार व बुनगें तीन कोसावरी मागें राहिले. दोन प्रहर पावेतों कोण्ही गोले टाकिले नाहींत. फौज बाहिर उभी. कारभारी राजीयासी गेले कीं माहाराज फौज बाहेर येऊन लागली, आपण अजून निजलेसे काय ? म्हणून उठवावयास लागले तों खिजमतगार म्हणाला कीं माहाराजानें यसें कर्म केलें. मग आकांत शहरांत जाहला. जुने कारभारी हरगोविंद व विद्याधर याणी थां बाधांब शाहरांत करून मग बाहिर भेटीस आले. उभयतांस भेटले. सुभेदारासहि सांगोन पाठविलें. तिसरा प्रहरास कूच करून शाहराजवळ फौज सुधां राहिले. पाहावयास माणसें पाठविलीं, तों खरेंच जाहालें. मग याणी चौकीया दरवाज्यावर जागजागी ठेविलें. राजमंदिरीं चौकी ठेविली. राजेयाचा मुरदा च्यारी प्रहर दिवसपर्यंत होता. मग सुभेदारानी कारभारी आपले मातबर दोघे पाठऊन व सेला पाठऊन अगिनडाव दिधलां. तीन बाईका व येक कलावंतीण यसें जलालें. दुसरीया दिवशीं राजेयाचे हवेलीतून चौक्या बसविल्या आणि इकड़े माधोसिंगास सांडणी-स्वार पाठविला. पत्र पाठविलें कीं जलदीनें येऊन पोहचणें आणि इकडे हरगोविंद व विद्याधर सुभेदारापासीं येऊन बहुत रदबदल करून शहरचा व राजियाचे आपेश तुम्ही माथां न घेणे, राज्य भारी आहे, याची स्थापना करावी. मग सुभेदाराचे चितास येऊन जागजागा चौकिया बसविल्या होत्या. खंडणीचा करार करून चौक्या उठविल्या. जैसा करार मदार होऊन च्यार रोज जाहले. राज्याची येक राणी व वीस कलावंतीणी तेहि सती पडल्या. रुपयाच्या वसुलास लागले. तो माधोसिंग पंधरावे रोजीं आला. सुभेदार पुढें जाऊन भेटले. येक हतीवर उभयता बसले. तैसेच गावात जाऊन त्याच्या हवेलींत घातलें. सुभेदार माघारे आले. माधोसिंग आल्यावरी आठवे रोजीं राजश्री जायाजी सिंदेहि आले. आपण दोन तीन वेळा सुभेदारास * त्यांस विचारिलें कीं आमच्या येवजाची वाट काय ?